जि. प. शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी (ता. गंगापूर) येथील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. परीक्षेत शाळेतील १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये सिद्धार्थ निरपळ याने २४८ गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. 

श्रावणी वायसळ २३८ गुणांसह द्वितीय, तर आयेशा सलीम सय्यद १८८ गुणांसह तृतीय आली. साई इष्टके १८४, रोहिणी जाधव १७८ गुण मिळवून उत्तीर्ण झाले. याशिवाय आराध्या गायकवाड (१७६ गुण), आरोही इष्टके (१७४), विराज क्षीरसागर (१७२), श्रुती भकंड (१६८), आराध्या कान्हे (१६८), आरशान शेख, (१६२), यश (१५८), सार्थक रोडगे (१३८), श्लोक पानकडे (१३२) या विद्यार्थ्यांनीही यश मिळवले. या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक दिनेश देशपांडे, वर्गशिक्षिका मीनाक्षी चौधरी, मार्गदर्शक शिक्षक नरसाळे व अजिनाथ बटुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, शिक्षिका मीना देहाडे, सुनीता वाकचौरे, शोभा पवार, मालन ठेंगळे यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले.